Moto G35 5G भारतात लॉन्च झालेला आहे. मोटोरोला चा हा फोन सर्वात स्वस्त पाहिजे स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत फक्त 10,000 रुपयांपेक्षाही कमी आहे. ज्यामध्ये 5000 mAh ची जबरदस्त बॅटरी व फास्ट चार्जिंग असे फीचर्स दिले गेलेले आहेत.
Motorola ने आपला एक सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे , ज्याची किंमत दहा हजार रुपये पेक्षाही कमी असून या फोनने Redmi,realme यांसारख्या ब्रँड्स कंपन्यांना टक्कर दिलेली आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन साठी युजर्स मध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण आता मोटोरोला नाही एकदम दर बॅटरी व फास्ट चार्जिंग सोबत चांगले फीचर्स देऊन मोटो G35 5G हा व्हेरियंट लॉन्च करून त्या कंपन्यांना टक्कर दिली आहे.
Moto G35 मध्ये खास काय?
- मोटोरोलाचा हा स्मार्टफोन एक बजेट फ्रेंडली फोन असून यामध्ये 6.7 इंच चा FHD+ डिस्प्ले दिलेला आहे, जो की 120Hz हाय रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो.
- या फोनमध्ये बॅकला प्रीमियम विगम लेदर दिलेला आहे. कंपनीने या फोनमध्ये विजन बूस्टर टेक्नॉलॉजी चा वापर केलेला आहे, जो की युजरसाठी एक चांगला एक्सपिरीयन्स राहील.
- याशिवाय फोन मध्ये वॉटर रिपेलेंट डिझाईन सुद्धा दिलेला आहे. एवढेच नव्हे तर फोन बॅक मध्ये अँटी फिंगरप्रिंट इम्प्रेशन फीचर्स सुद्धा मिळत आहे.
- कंपनीचं असं म्हणणं आहे की हा फोन या प्राइस रेंजमध्ये सर्वात हलका आहे, जो की 7.79mm आहे आणि याचे वजन फक्त 185 ग्राम आहे.
- या स्मार्टफोनच्या डिस्प्ले मध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चा प्रोटेक्शन मिळेल. यासोबतच हा फोन IP52 रेटिंग सोबत येत आहे, याचा अर्थ आहे की हा पाण्याच्या थेंबाने खराब नाही होणार.
- हा बजेट फोन Unisoc T760 प्रोसेसर सोबत येतो. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB चे इंटरनल स्टोरेज पहावयास मिळते, व याला मायक्रो एसडी कार्ड करू शकाल.
- या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची जबरदस्त बॅटरी सोबतच 20W USB Type C चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
- हा फोन Android 14 सोबत येत आहे, व कंपनीने वेगळे तीन वर्षासाठी सॉफ्टवेअर अपडेट देण्याचे वचन दिलेले आहे.
- कनेक्टिव्हिटी बद्दल बोलले तर हा मोबाईल 12 5G बँड ला सपोर्ट करतो. आणि यामध्ये ब्लूटूथ 5.0 व वायफाय सारखे फीचर्स मिळतात.
- फोनच्या बॅक मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, व यात 50MP चा मेन कॅमेरा आणि 8MP अल्ट्राव्हाइड कॅमेरा मिळतो, त्यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16MP कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये आपण 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.
- मोटोरोला चाय हा सस्ता स्मार्टफोन magic eraser, Photo Unblur, Magic Editor, सारखे AI फीचर्स सोबत पहावयास मिळतो.
- यात डूअल स्टिरिओ स्पीकर्स, Dolby Atmos सारखे लेटेस्ट फीचर्स दिलेले आहेत.
Moto G35 5G ची किंमत किती ?
मोटोरोला हा 5g स्मार्टफोन 9,999 रुपये या किमतीत लॉन्च केला गेलेला आहे.
हा फोन तीन कलर मध्ये उपलब्ध आहे.
- Guava red
- Leaf green
- Midnight Black
हा फोन पहिली बार ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सोबत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर 16 डिसेंबर ला लॉन्च करण्यात आले होते.