Weather Update “या” तारखांना महाराष्ट्र मध्ये पडणार मुसळधार पाऊस.? पहा हवामान अंदाज अपडेट.

Maharashtra Weather Update नमस्कार मित्रांनो सध्या मे महिना चालू आहे आणि मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे मुंबई डोंबिवली या परिसरामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांमध्ये पडणारा पाऊस हा अवकाळी चा पाऊस होता पण आता मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे याकडे सर्व नागरिकांची आणि शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आता यामध्येच हवामान खात्याअंतर्गत एक मोठा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या अंदाजाप्रमाणे मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार आहे.? हे सांगण्यात येत आहे.

 

मित्रांनो आता नैऋत्य मोसमी वारे 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार च्या बेटांच्या परिसरामध्ये दाखल झाले असल्याचे सांगितलेले आहे आणि याच नैऋत्य भारतातील मान्सूनचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये आलेले आहेत. पण आता केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख अजून जाहीर झाली नाही पण सध्या वातावरण आपल्या लक्षात येत आहे की यावर्षी लवकरच मान्सून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सून हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आहे यामध्ये थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ.

 

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार.?

मान्सूनचा पावसा शक्यतो 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होत असतो आणि अंदमानमध्ये जवळपास 24 तास पाऊस झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होत असतात. पण यावर्षी अगोदरच अंदमान मध्ये हे वारे सक्रिय झालेले आहेत आणि यामध्ये कुठलाही अडथळा आलेला नाही. आणि यानुसार एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे तसेच महाराष्ट्र मध्ये 08 जूनच्या आसपास पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. कोकणामध्ये यावर्षी लवकर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मान्सून आठ ते दहा जून च्या आसपास दाखल होणार असून आठ ते दहा जूनच्या आसपास पावसाला देखील सुरुवात होणार आहे.

Leave a Comment