Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजनेमध्ये मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान, हे लाभार्थी आहेत पात्र.?

Shabari Gharkul Yojana नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना ही महाराष्ट्र राज्यांमधील समाज कल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणारी एक प्रमुख योजना सुनी या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थ्यांना जवळपास दोन लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. आता मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे.? हे देखील आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

 

या योजनेमध्ये जे अनुदान मिळणार आहे हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.? तसेच या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे.? आणि या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत.? तसेच लाभ घेण्यासाठी महत्त्वाची डॉक्युमेंट्स कोणते आहेत.? हे देखील या लेखांमध्ये आपण जाणून घेऊयात.

 

जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ हवा असेल किंवा या योजनेचा अर्ज पाहिजे असेल तर तो सुद्धा आम्ही आपल्या वेबसाईट वरती दिलेला आहे ज्याची लिंक आम्ही सर्वात शेवटी दिलेले आहे त्या लिंक वर क्लिक करून या योजनेचा जीआर पाहू शकता आणि अर्ज सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता.

 

शबरी घरकुल योजनेसाठी हे लाभार्थी आहेत पात्र

शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार असावा यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जे लाभार्थी अर्ज करणार आहेत ते मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
लाभार्थीचे आहे त्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नसेल तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागातील आहे तर त्यांच्यासाठी एक लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे आणि नगरपरिषद तिथे असेल तर वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे.

 

ही लागतील आवश्यक कागदपत्रे

रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
वयाचा दाखला
जमिनीचा सातबारा आठ अ उतारा
बँक खाते पासबुक
ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामपंचायत)

 

असा करा अर्ज

शबरी घरकुल योजनेमध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज आपल्याला गावांमधील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सादर करावा लागणार आहे.

 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही शबरी घरकुल योजनेचा अर्ज डाऊनलोड करू शकता.

 

अर्ज डाऊनलोड करा 👉 इथे क्लिक करा

 

Leave a Comment